राजकुमार राव मेड इन चायना च्या फर्स्ट लुक मध्ये सूट घालून, सामानाने भरलेली पोतडी खांद्याला लावून उभा
प्रभावी २०१७ व २०१८ नंतर राजकुमार राव ह्यांनी २०१९ ची सुरुवात पण दणक्यात केली आहे. १ जानेवारीला राजकुमारच्या मेड इन चायना चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. मिखिल मुसळे ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या मेड इन चायना मध्ये राजकुमार राव एका गुजराती व्यावसायिकाची भूमिका करत आहेत ज्याला चीनमध्ये व्यवसाय करायचा आहे. चित्रपट ३० ऑगस्ट २०१९ ला रिलीज होणार आहे. …