1546538170 141499

राजकुमार राव मेड इन चायना च्या फर्स्ट लुक मध्ये सूट घालून, सामानाने भरलेली पोतडी खांद्याला लावून उभा

प्रभावी २०१७ व २०१८ नंतर राजकुमार राव ह्यांनी २०१९ ची सुरुवात पण दणक्यात केली आहे. १ जानेवारीला राजकुमारच्या मेड इन चायना चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला.

मिखिल मुसळे ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या मेड इन चायना मध्ये राजकुमार राव एका गुजराती व्यावसायिकाची भूमिका करत आहेत ज्याला चीनमध्ये व्यवसाय करायचा आहे. चित्रपट ३० ऑगस्ट २०१९ ला रिलीज होणार आहे.

ट्विटरवर शेर केलेल्या फर्स्ट लुकमध्ये राजकुमार राव एका गोंधळलेला उद्योजकाच्या भूमिकेत दिसत आहे. फर्स्ट लूकमध्ये राजकुमार राव सूट घालून खांद्याला सामानाची पोतडी लावून चीनमध्ये उभा आहे. 

अगोदर हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार होता परंतू अक्षय कुमारच्या मिशन मंगलशी टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

मेड इन चायना हा एक कॉमेडी ड्रामा असून पहिल्यांदाच मौनी रॉय आणि राजकुमार एकत्र काम करणार आहेत. ती कदाचित राजकुमारच्या पत्नी ची भूमिका करत आहे.

चित्रपटात बोमन इराणी खूप वर्षांनी मुन्नाभाई एमबीबीएस (२००३) ह्या चित्रपटानंतर डॉक्टरची भूमिका करत आहेत.

२०१९ मध्ये राजकुमार खूप व्यस्त आहेत. सुरुवातीला ते दिग्दर्शक शेली चोप्रा धर ह्यांच्या एक लडकी को देखा तो ऐसा लगा चित्रपटात सोनम कपूर बरोबर दिसणार आहेत. त्यानंतर हंसल मेहता ह्यांचा तुर्रम खान ह्या कॉमेडी चित्रपटात आणि कंगना रानौत बरोबर मेंटल है क्या चित्रपटात काम करत आहेत.

मेड इन चायनाची निर्मिती दिनेश विजान करत आहेत. राजकुमार राव त्यांच्याबरोबर आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top